Sunday, 3 February 2013

एका तलावाच्या काठावर : Marathi Prem Katha

♥ एका तलावाच्या काठावर ... ♥

प्रियकर :- चल तिथे बसू, किती छान कमळ आहे बघ ...!
प्रेयसी :- ई !! ... नको, खाली किती चिखल आहे
 बघ ...त्यापेक्षा तलावाच्या त्या बाजूला बसू,
किती छान बदके आहेत बघ,
प्रियकर :- वरवरच्या सौंदर्या कडे आपण
बघतो म्हणूनच आत मधले प्रेम लवकर कळून येत
नाही ...वास्तविक मी तुझ्यावर, "
त्या पांढर्या शुभ्र सुंदर बदकांसारखे
नव्हे तर चिखलात उमललेल्या कमळासारखे प्रेम करतो"
प्रेयसी :- ते कसे ? प्रियकर:- "जे
पक्षी तलावाच्या पाण्यात राहतात ते
तलाव सुकून गेल्यावर दुसरीकडे उडून जातात,...
तेच जे कमळ त्या तलावात वाढते ते मात्र त्या तलावा बरोबरच मरते..."

Friday, 1 February 2013

सगळे सेन्सर काल पासून बंद पडलेयत.

                                                                             आज ते दोघेही खुश होते....असणारंच ना?....कारण आज ते खूप दिवसांनी एकमेकांना भेटणार होते.
भेटायचे म्हणून आज ती केस मोकळेच सोडून आली होती....कारण त्याला आवडायचे तिचे मोकळे सोडलेले केस.
त्याला ती जशी आहे तशी आवडायची म्हणून ती सुद्धा तशीच आली होती.....न नटता थटता...एकदम साधी...
त्याने तिला लांबूनच येताना पहिले.
दोघांनाही एकदम आनंदाचे झरे फुटले.....


दोघेही बीचवर गेले बसायला....
दोघांनीही खूप गप्पा मारल्या....
समुद्रावर दोघेही जीव एकदम सुखात बसले होते.

"अथांग सागराची लाट,
दोघांचे हातामध्ये हात,
डोळ्याच्या समईत स्वप्नांची वात,
स्पर्शाची उब अन....सोबत थंड वाऱ्याची साथ"

मधेच तिच्या लक्षात आले कि,तो तिच्याकडेच पाहत बसलाय....तिला लाजायला झाले,
म्हणाली,
"ये जाणा.....माझ्याकडे का पाहतोयस असा.....समोर बघ ना....समुद्र बघ कसा फेसाळलाय....मस्त दिसतोय"
"अगं पण त्याच्यापेक्षा मी आता जो पाहतोय तो समुद्र मस्त दिसतोय."
तिला अजून पाणी पाणी व्हायला झालं....तरीही ती म्हणाली...."बस हा बस झालं..."
तो म्हणाला,"ये ऐक ना....गोव्याचे समुद्र कि नाही मस्त आहेत....शांत एकदम....एकदम......"
"बस बस.....पुरे झाले "गोवा पुराण"......गोव्याचे बीच असे होते...गोव्याचेबीच तसे होते....." तिने त्याचे वाक्य मधेच तोडले.
तो हिरमुसला बिचारा आणि सांगितल्या प्रमाणे समोर समुद्राकडे पाहू लागला.
तिच्या लक्षात आले ते आणि तिने त्याच्या खांद्यावर डोके टेकवले...
म्हणाली,
"तुज्या खांद्यावर डोके ठेवले न कि सगळा त्रास विसरायला होतो......खूप खूप आयुष्य जगावसं वाटतं"
मग काय?......गेला त्याचा सगळा राग.....
ती मधेच शांत झाली,
"माझे बाबा नाही तयार होणार रे आपल्या लग्नाला.....आपणथांबवू हे सगळे...."
"अगं मी समजावेन त्यांना...त्यांना तुला सुखातंच बघायचीय ना.....मी करेन त्यांच्या सगळया इच्छा पूर्ण.जरूर ऐकतील ते"
आणि तो तिला समजावून सांगू लागला....सगळे ऐकून मग ती थोडी शांत झाली....
तिला समजावून मग तो तिच्याकडे थोडीशी पाठ करून बसला,
तिच्या लक्षात आले ते....तिने त्याची हनुवटी धरून त्याचा चेहरा स्वतःकडे फिरवला,
त्याचे डोळे पाणावलेले होते,
म्हणाली,"अरे रडतोस काय वेड्या.....काय झाले?
म्हणाला,"काय नाही गं....खरंच तुजे बाबा त्या नाही झाले तर?....हा विचार करत होतो..तेव्हा जो एकटेपणा वाटेल ना तो जाणवत होतो"
"अरे तू पण ना वेडा आहेस....मंद.....मी कुठे जात नाहीयेय.....मी फक्त तुजीच आहे....फक्त तुझीच"
असे बोलून तिने त्याच्या गालावर चुंबन घेतले आणि म्हणाली,"माझे तुझ्यावर खूप खूप खूप खूप.......खूप प्रेम आहे".
तो म्हणाला,
"काय म्हणालीस?मला ऐकायला नाही आलं....कालपासूनकमी ऐकायला येतंय...
आणि
आता गालावर काय केलंस??????माझे सगळे सेन्सर काल पासून बंद पडलेयत...काही जाणवतच नाहीयेय....पुन्हा कर बघू".
लाजली ती...म्हणाली..."हो का?......बावळट....."

आयुष्याची सुरेल स्वप्न..

तो: काय ग...
आज रडलीस वाटत?


कोणाशी तरी भांडलीस वाटत?



ती: तुला कस कळाल?

तो: हो कि नाही ते सांग...

ती: हो रे....
पण तुला कस कळाल?...
सांग ना...

तो: कळाल कस तरी...

 
ती: सांग ना ...
कस कळत रे तुला,
माझे डोळे पाणावलेले ते?...
कस कळत रे तुला,
आज मी खूप हसली ते?...
कस कळत रे तुला,
आज मी कोणाशी तरी भांडली ते?...
अन कस कळत रे तुला,
आज मी खूप खूप रडली ते?....
कस कळत रे तुला माझ मन?...
कशी कळते रे तुला,
तुझी येणारी ती आठवण?...
कस कळत रे तुला,
आज मी आहे खूप उदास?...
अन कस कळत रे तुला ,
माझ्याकडे आहे आज ,
तुला सांगायला काही तरी खास?...
सांग ना...
मला भेटताच,
कस ओळखतोस रे तू हे सगळ?...
सांग ना...
कस कळत रे तुला, माझ्या मनातल सगळ?...

तो: आग वेडे...
मला नाही तर कोणाला कळणार....
तुझ हे कोवळ मन,
माझ्याशिवाय कोण जाणणार...
प्रेम करतो न ग मी तुझ्यावर,
मग तुझ्या ह्या मनाला,
मी नाही तर कोण सांभाळणार...
सांग ना...
कोण सांभाळणार..
हे ऐकून ती हस्ते,
अलगद त्याच्या मिठीत जाते...
प्रेमाचे ते गोड शब्द बोलते...
अन आयुष्याची सुरेल स्वप्न रंगवत सुटते...
आयुष्याची सुरेल स्वप्न..
ती रंगवत सुटते...

तुम्हाला प्रेम झालंय का नाही? हे ओळखण्याच्या आठ निशाणीयाँ

तुम्हाला प्रेम झालंय का नाही? हे ओळखण्याच्या आठ निशाणीयाँ 

१)तुम्ही त्यांचे sms पुन्हा पुन्हा वाचता.. 

२)तुम्ही त्याच्यासमोर यायला घाबरता 

३)जेव्हा तुम्ही त्याच्याविषयी विचार करता तेव्हा तुमचं हृदय जोरजोरात धडकु लागतं, 

४)त्याचा नाव ऐकुन आनंदाने एक आपसुक हसु चेहर्यावर उमलते.. 

६)तुम्ही त्याच्यासाठी काहीही करु शकता...

 ७)हा लेख वाचताना देखील तुमच्या मनात त्याच्याविषयीचाच विचार आहे.. 

८)तुम्ही त्याच्या विचारात इतकं गुंतलाय की यामधला पाचवा पॉँईँट मिसिँग आहे, हे देखील कळलं नाही तुम्हाला.... हो रे प्रेम हे असेच असते...

मी तिला विचारले किती गं करतेस माझ्यावर प्रेम..


मी तिला विचारले किती गं करतेस माझ्यावर
प्रेम..
हसत म्हणाली माझ्या नजरेला जरा वाचत जा..
मी विचारले किती गं असे भेटायचे चोरून चोरून..


ती म्हणाली प्रेमात थोडासा धीर धरत जा..


मी म्हणालो आता मला तुझ्या साथीची गरज
आहे..

ती म्हणाली त्यासाठी देवासमोर रोज
हात जोडत जा..

मी म्हणालो खूप ओझं झालंय एकाकीचं आता..

ती म्हणाली अरे वेड्या मग आठवणी थोडंसं रडत
जा..

मी म्हणालो अरे पापण्या ओल्या होतात
विरहात तुझ्या..

ती म्हणाली मुखवटे घालून थोडंसं हसत जा..

मी म्हणालो ऋतू सुध्दा माझ्यावर हसतो आहे..

ती म्हणाली अरे मग एक छानसी गझल ऐकत जा..

मी विचारलं असतेस कुठे सध्या तू..
तेव्हा मात्र

ती म्हणाली माझ्या श्वासांना तुझ्यातचं
कुठेतरी शोधत जा..

मी विचारलं हि कुठली रीत तुझी प्रेम
करण्याची..

ती म्हणाली अरे प्रेमात कधी असाही एकमेव
अनुभव घेत जा..

मी विचारलं आता किती वाट
बघायची तुझी सखे..

ती म्हणाली नेहमीचं तू तरसवतोस मला आता तू
ही तरसून बघत जा.....

आवड आणि प्रेम यामधील फरक काय..???

आवड आणि प्रेम यामधील फरक काय..???
.
.
.
.


.
.
जेंव्हा तुम्हाला एखादं फुल चांगलं वाट्टे
आणि तुम्ही ते तोडता...ती आवड
पण
जेंव्हा एखादं फुल चांगलं वाट्टे
आणि तुम्ही त्याला पाणी घालता...ते प्रेम

मन उधाण वार्याचे(एक प्रेमकथा)


स्वरुप हे अंजलीचे शिक्षक होते.दोघांच्या वयामध्ये जास्त काही अंतर नव्हतंच मुळी.स्वरुपचंअंजलीवर खुप प्रेम होतं.एक दिवस योग्य वेळ बघुन त्याने ते व्यक्त केलं.अंजलीनेही आपल्या आयुष्याचा योग्य साथीदार मिळतोय म्हणुन त्याला होकार दिला.त्यांचं लग्नही झालं.पण लग्नाच्या काही दिवसानंतर अंजलीला कळु लागलं की,स्वरुप आपल्यामध्ये पुरेसं अंतर बाळगतोय जे न

वरा बायकोमध्ये कधीचअसत नाही.तिला हेच समजत नव्हतं कीतो असं का करतोय?प्रेमामध् ये त्यानेच पुढाकार घेतला असतानासुद्धा, मनाविरुद्ध लग्न लावुन दिलेल्या माणसासारखा तिला स्पर्शही करत नव्हता.ही बाब तिने त्याच्या काकांना सांगितली.
त्याचे काका एक मनोवैज्ञानिक तज्ञ असल्याने ते त्याची मानसिक स्थिती योग्य पद्धतीने समजु शकतील असं तिला वाटत होतं.काकांनी एक दिवस हवापालटचा बहाणा करुन माझ्याकडे स्वरुपला घेउन यायला सांगितलं.ठरल्या प्रमाणे ती घेऊन आली.योग्य ती वेळबघुन काकांनी स्वरुपला संमोहीत केलं.आणि त्या अवस्थेत काकांनी त्याला काही प्रश्ने विचारली.विचारले ल्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्याने दिली.नंतर त्याला नॉर्मल स्थितीतआणलं गेलं.
काका अंजलीला,स्वरुपक डुन मिळालेली सर्व माहीती एकांतात सांगु लागले....
स्वरुपचं आपल्या आईवर प्रचंड प्रेम होतं.त्याच्या जन्माच्या दोन वर्षानंतरच त्याचे वडील वारले.त्यामुळे त्याला आपल्या आईजवळच झोपायची सवय लागली.तो कधीही त्याच्या आईला सोडुन दुर झोपलाच नव्हता.आईचं प्रेम म्हणजेजवळजवळ त्याच्यासाठी व्यसनच झालं होतं.पण त्याच्या वयाच्या अठराव्या वर्षी तिच्या आईचा मृत्यु झाला.त्याचा जबर आघात त्याच्या मनावर झाला.अचानक बदललेली ही परिस्थीती त्याचं मन,त्याचा मेंदु स्वीकारु शकत नव्हता.पण त्यावेळी त्याच्या मनाजवळ/ मेंदुजवळ ही परिस्थिती स्वीकारण्याशिवा य दुसरा पर्यायचनव्हता.त्यामुळे त्यावेळची मानसिक स्थिती त्याला दाबावी लागली.दहा वर्षाँनंतर जेव्हा तो शिक्षक होता तेव्हा तु कॉलेजमध्ये नवीन अॅडमिशन घेतलंस.आणि इतकी वर्षे पर्याय नसलेल्या त्याच्या मनाला आई मिळवण्याचा एक पर्याय मिळाला.कारण तुझ्या आणि त्याच्याआईच्या चेहर्यात जवळजवळ 70%साम्य आहे.त्याची वास्तविक स्थिती आणि त्याचं बालपण अशा दोन वेगळ्या स्थितींचं त्याच्या मेंदुत एक प्रकारचं जबर एकत्रीकरण झालंय.जे एकमेकांच्या गरजा पुरवण्याचा प्रयत्न करतात.त्यामुळेच त्याच्या बालपणातली आई मिळवण्यासाठी त्याच्या तरुणपणाने तुझ्याशी लग्न केलंय.....
मनोवैज्ञानिक असणार्या काकांचं हे बोलणं ऐकुन तिच्या पायाखालची जमिन सरकली.तिच्या मेँदुतल्या सगळ्या तारा तुटल्यासारखं तिला वाटु लागतं.एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत असंही घडु शकतं याचा तिला विश्वासच बसत नव्हता.अंजली काकांना विचारते,मग स्वरुप बरा कसा होऊ शकतो हे सांगाल का?
सांगतो....हे बघ नवरा बायकोच्या बाबतीत स्त्रियांना नॉर्मली असं वाटत असतं की,शरीरसुखाच्या बाबतीत त्यांच्या नवर्याने प्रामुख्याने पुढाकार घ्यावा.पण तुझ्या बाबतीत ही गोष्ट वेगळी आहे.इथे शरीरसुखामध्ये पुढाकार तुला घ्यायचाय.जर तु शरीरसुखामध्ये स्वतःहुन पुढाकारघेतलास आणि त्याच्या मनातल्या तारुण्याच्या भावना जागृत करु शकलीस.तरच तुझा स्वरुप तुला मिळु शकेल.कारण त्याचं तरुणपणच त्याच्या बालपणावर मात करु शकतं..समजलं...ह ो समजलं काका.पुर्ण समजलं,मी तुमची खुप खुप आभारी आहे.मी असंच करेन.
सहा महीन्यानंतर मिठाईचा बॉक्स घेऊन अंजली आणि स्वरुप काकांकडे येतात.अंजली काकांना म्हणते,ही मिठाई कशासाठी माहीतीये का काका?आज मी दोन महीन्यांची गर्भवती आहे.त्यासाठीची आहे ही मिठाई.हे ऐकुन काका दोघांना शुभेच्छा देतात.आणि स्वरुपला ही मिठाई काकुंना देऊन येण्यास सांगतात.स्वरुप आतमध्ये जाताच,अंजली बोलु लागते,काका तुमचे आभार कसे मानावे हेच कळंत नाहीये मला,मी तसंच केलं जसं तुम्ही सांगितलं होतं.त्याने खरंच खुप फायदा झाला आणि आतातर खुपवेळा स्वरुपच अशा गोष्टीँसाठी पुढाकार घेतो.तो प्रचंड रोमँटीक आहे जे मला खुपच आवडतं.
अगं हेच तर हवं होतं मला तुमचं आयुष्य तुम्ही आनंदाने जगताय याशिवाय मला आणखी काय हवं...