1 ) साजुक तुपात , नाजुक चमचा ,
.... चे नाव घेते आशिवाद आसुदे तुमचा
अशीच राहु दे माझी व ...रावांची प्रेम ज्योती.....
.... चे नाव घेते आशिवाद आसुदे तुमचा
2 ) हातात घातल्या बांगडया, गळ्यात घातली ठुशी,
...रावांचे नाव घेते, सत्यनारायणाच्या दिवशी
...रावांचे नाव घेते, सत्यनारायणाच्या दिवशी
3 ) .....हा दिवस आहे आमचा करता खास,
-- ला देते गुलाब जामुन चा घास
4 ) परसात अंगण अंगणात तुळस
----- नाव घ्यायचा मला नाही आळस
5 ) रुपेरी सागरावर चंदेरी लाट, ---रावानच नाव घेते सोडा माझी वाट
6 ) ईंन्द्रधनुष्य दिसतो जेव्हा असत् पावसात ऊन
... रावांच नाव घेते .... ची सुन्
7 )मंगळसुत्रातील दोन वाटया सासर आणि माहेर .......रावांनी दिला सौभाग्याचा आहेर.
8 ) लग्नात्त लागतात हार आणि तुरे
.... च्या नाव घेण्याचा आगृह् आता पुरे
9 ) आजच्या सोहोळ्यात थाट केलाय खास
-- ला भरविते जिलेबिचा घास
10 ) बारिक मणी घरभर पसरले,-----
साठि माहेर विसरले
11 ) रुसलेल्या राधिकेला श्रीकृष्णा म्हणतो हास
------ नाव घेते तुमच्यासाठी खास
12 ) प्राजक्ताच्या फुलानि भरले अंगण
---रावांचे नाव घेवुन सोडले क़ंकण
13 ) निरभ्र आकाशात चंद्राचि कोर
.....च नाव घेते भाग्य माझे थोर्
14 )भाव तेथे शब्द,शब्द तेथे कविता ----- रांवाच नाव घेते खास तुमच्या करिता.
15 ) सोन्याचे मंगळ्सुत्र सोनाराने घडविले,
--- रावांचे नाव घ्यायला सगळ्यांनी अडविले.
--- रावांचे नाव घ्यायला सगळ्यांनी अडविले.
16 ) चांन्दिच्या त्ताटात अगरबत्तिचा पुडा
......... च्या नावाने भरला हिरवा चुडा
17 ) हिमालयाच्या पायथ्याशि उतरल्या लतिका, ...चे नाव घेते ....चि बालिका.
18 ) सरिते वर ऊठतात तरंग,सागरा वर उठतात लाटा,-----च्या सुख दुखात अर्धा माझा वाटा
19 ) शुभवेऴी शुभदिनी आली आमची वरात,
... रावांचे नाव घेते, पहिले पाऊल घरात
20 ) जिवनाच्या वाटेवर पाऊल नवीन ठेवते
सगळ्यांचा मान राखून नाव **** चे घेते
21 ) खण खण कुदळी मण मण माती मण मातीच्या उभारल्या भिन्ती, चितारले खांब;सासुबाईंच्या पोटी आक्काबाईंच्या पाठी उपजले राव,राव नाही म्हटलं,नाव नाही घेतलं;३२ पानं ३२ सुपारी तोंडात विडा बोलु कशी? सदर दाराची,नजर पुरुषाची सदरेला उभी राहू कशी?येत होते जात होते घड्याळात पाहात होते;घड्याळात वाजले तीन ......ची वाट पाहाते .....ची सुन्.
22 )सुशिक्षित घराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले.....रावाचे नाव घेउन मी सौभाग्यवति झाले
23 ) भाव तेथे शब्द,शब्द तेथे कविता
.....चे नाव घेते तुमच्या आघ्रहाकरिता
24 ) एक दिवा दोन वाती
एक शिंपला दोन मोतीअशीच राहु दे माझी व ...रावांची प्रेम ज्योती.....
25 ) रुसलेल्या राधेला कान्हा म्हणतो हास
....रावांना भरवते ...चा घास
26 ) श्रीकृष्णाने केले अर्जुनाच्या रथाचे सारथ्य....आणि माझ्या संसारात होईल तुम्हा सगळयांचे नेहमी आदरातिथ्य. 27 ) आजच्या सोहळ्याचा थाट केलाय खास
-- ला भरविते जिलेबिचा घास
28 ) महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाकुन्
.... नाव घेते सर्वांच मान राखुन
29) मंद वाहे वारा,संथ चाले होडी,
परमेश्वर सुखी ठेवो ***,*** ची जोडी
30 ) आंब्यात आंबा हापुस आंबा
---- चे नाव घेते तुम्हि थोड थांबा.
31 ) ग़जाननाच्या मन्दिरात सन्गिताचि गोडि
सुखि थेवा गजानना -- चि जोडि
No comments:
Post a Comment