Tuesday, 23 April 2013

खरचं प्रेम होतं तुझ्यावर !! का? तु समजुन घेतले नाहीस.?'

का कधी कधी अस होत..???
आपण कोणावर इतके प्रेम करतो...
.
पण त्याला त्याची
अजिबात जाणीव हि नसते...
.
.
का कधी कधी अस होत.?
आपले मन कोणासाठी इतके झुरते..
.
पण त्याला त्याची
अजिबात कदर नसते...
.
.
का कधी कधी अस होत.?
कि त्या व्यक्तीशिवाय
आपण अजिबात राहू शकत नाही..
.
पण ती व्यक्ती आपल्या
शिवाय हि खूप खुश असते...

... Sid™…             



                                          -
Rachana Varma

MUST READ !!!!!!!

MUST READ !!!!!!!
मुलींच्या मागे भरकटलेली मुलं....
माझ्या मनात कधीकधी विचार येतात
आज काल ची मुलं,
मुलींच्या मागे लागून
स्वताचा वेळ वाया का घालवतात???
...
Chance मिळाला तर प्रतेक मुलीला
पटवायचा प्रयातना करतात,
जर नवीन नाही पटली तर
जुन्या GirlFriend वर भागवतात.

Hi-Hello करून ओळख होताच
Date वर यायची विचारणा करतात,
स्वाताच्या किंवा वडलांनी कमावलेल्या
पैशांची मात्र वाट लावतात.

जराशी ओळख होताच मागे लागून
तिचा Cell Number मिळवायचा प्रयातना करतात,
तिच्या बरोबर् Dating वर जाऊन
स्वतः बरोबर् तिचा ही वेळ वाया घालवतात.

आकाशातले चंद्र-तारे तोडून आनन्या पर्यंत
नको त्या फुशार्क्या मारतात,
तिने "लग्नं कधी करतोस" विचारताच
तिच्या पासून लांब पळू लागतात.

एक GirlFriend पटवून
हे कधी शांत बसलेच नाहीत,
म्हणून तर अभ्यास करायचा सोडून
ह्यानी मुल्लीच जास्त पटवलेल्या असतात.

पड पड धडपड करून एखादी
नोकरी काशीबशी मिळवतात,
पण शेवटी सवई प्रमाणे Office मधे सुद्धा
Line मारायला सुरवात करतात.

एक हृदय तुमच्या जवळ आहे
त्याचे तुकडे किती करणार आहात,
किती ही मुली पटवल्या तरी
लग्न मात्र एकिशीच करणार आहात.

तुझ्याकडे प्रेमाची

तुझ्याकडे प्रेमाची
शिकवणी लावावी लागेलं
डोळ्यांनी कसं बोलावं
हे शिकावं लागेलं
जाळ कसं विणतेस
हे बघावं लागेलं
कटाक्षान कसं फसवाव
ते शिकावं लागेलं
प्रश्न हा आहे प्रिये
माझे डोळे बोलके नाहीत
तुझ्याइतके सुंदर
न जादूभरे नाहीत
तूच घे प्रिये
माझ्या मनाचा ठावं
दिसेल तुला हृदयात
तुझ्या प्रेमाचा गावं
मग तूच म्हणशील
इतकं कसं प्रेम करतोस
प्रेम कसं करावं
तुझ्याकडून शिकावं लागेलं….
.
.
.
.♥j

Sunday, 17 March 2013

Ch-52 पुन्हा मेसेज? (समाप्त)


तो आवाज एकताच अंजलीलाच नाही तर सर्वांना एक क्षण भास झाल्यासारखे झाले. अंजलीचं रडणं थांबलं होतं. सगळे जण स्तब्ध उभे राहून दरवाजाकडे पाहत होते.

'' अंजली '' पुन्हा आवाज आला.

यावेळी फारच जवळून आल्यासारखा. अगदी दरवाजाच्या बाहेरुन. आता अंजली उठून उभी राहाली आणि दरवाजाकडे जावू लागली. रुममधील इतर लोकही दरवाजाकडे जावू लागले. अंजली दरवाजापर्यत पोहोचली असेल तेव्हा रुमचा दरवाजा उघडला आणि दरवाजात विवेक उभा होता. त्याचे कपडे आणि सर्व शरीर रक्ताने मागलेलं होतं. दोघंही आवेगाने एकमेकांकडे झेपावले आणि त्यांनी एकमेकांना आगोशात घेतले.


अतूलने इन्स्पेक्टरला पासवर्ड सांगितल्यानंतर सुरु असलेला मोबाईल गाडीच्या बोनेटवर ठेवला. आणि तो त्या विवेकडे तानलेल्या बंदूकीचा ट्रीगर दाबू लागला.

'' थांब ... तु फार मोठी चूक करतो आहेस...'' विवेक कसाबसा बोलला.

'' चूक... यानंतर तुझ्यामुळे... फक्त तुझ्या हट्टामुळे... मी ज्या गुन्हेगारी जगतात जाणार आहे ... त्यासाठी मला एक पात्रता लागणार आहे... विचार कोणती? ... कमीत कमी एक खुन... आणि ती मी आता पुर्ण करणार आहे'' अतूल म्हणाला आणि त्याने पटकन बंदूकीचा ट्रीगर दाबला.

एक मोठा आवाज आला आणि अतूलच्या हातात असलेल्या बंदूकीचा एखाद्या बॉम्बप्रमाणे विस्फोट झाला. अतुलच्या शरीराचे चिथडे चिथडे होवून चारी बाजुस उडाले होते. विवेक आपला बचाव करीत मागे झेपावला होता. तरीही अतूलच्या शरीरातल्या रक्ताचे शिंतोडे कारवर, आणि आजुबाजुला उडून विवेकच्या अंगावरही उडाले होते. त्याचे सर्व कपडे आणि शरीर अतूलच्या रक्ताने माखलं होतं.

थोड्या वेळाने विवेक उठून उभा राहाला. त्याने एक नजर अतूलच्या खाली पडलेल्या छिन्नविछिन्न मृत देहाकडे टाकली.

तरीही मी त्याला सांगण्याचा प्रयत्न केला होता की ती बंदूक नसून बॉम्ब आहे...

पण तो मानलाच नाही ... त्यात माझा काय दोष...

विवेक आपल्या मनाची समजूत घालत होता.

शेवटी काय... की पराई नार ... और पराये हथीयारसे आदमीको बचना चाहिए...

विवेकच्या मनात येवून गेले.


अंजली आपल्या ऑफीसमधे आपल्या कामात व्यस्त होती. तिने नेहमीप्रमाने आल्या आल्या आपला कॉम्प्यूटर ऑन करुन ठेवला होता. तेवढ्यात कॉम्प्यूटरवर चाटींगचा बझर वाजला. तिने मॉनिटरवर बघितले. एक मेसेज होता -

'' मिस अंजली ... 50 लाख रुपयांची माझ्यासाठी व्यवस्था कर नाहीतर परिणाम तर तु जाणतेस...'' अंजलीने तो मेसेज वाचला आणि तिच्या अंगावर काटे उभे राहाले.

तेवढ्यात विवेक आणि शरवरी तिच्या कॅबिनमधे शिरले.

'' अंजली चल आज पिक्चरला जावूया...मॉर्निंग शो''

'' विवेक ... इकडे तर बघ... ब्लॅकमेलरचा पुन्हा मेसेज आला आहे'' अंजली त्याचं लक्ष मॉनिटरकडे आकर्षीत करीत म्हणाली.

विवेक कॉम्प्यूटरच्या जवळ जावून बघू लागला. पण शरवरी आपलं हसणं लपवू शकली नाही. ती जोरजोराने हसायला लागली.

'' ए काय झालं?'' अंजली.

'' अगं तो मेसेज आत्ता विवेकने शेजारच्या कॅबिनमधून पाठवला आहे'' शरवरी हसत हसत म्हणाली.

'' पण तो तर आत्ताच इथे आला'' अंजली.

'' अगं नाही ... आम्ही शेजारच्या कॅबिनमधून तो मेसेज पाठवून लागलीच इकडे आलो.

'' यू नॉटी बॉय'' अंजली विवेकवर पेपरवेट उगारत म्हणाली.

आणि मग पेपरवेट टेबलवर ठेवत ती उठली आणि त्याच्यापाशी जावून त्याच्या छातीवर प्रेमाने मारु लागली. विवेकने प्रेमाने तिला आपल्या आगोशात ओढून घेतले.


समाप्त


THE END   





Read Udan ( Please Add Skeep ) ..............

Ch-51 दवाखाना


मोबाईलमधून बंदूकीच्या गोळीचा आवाज आला आणि अंजली घेरी येवून खाली पडली. कंपनीच्या हॉलमधलं आनंदी वातावरण एकदम श्मशानवत शांत झालं. इन्स्पेक्टरने घाई करुन एकदोन जणांच्या मदतीने अंजलीला उचललं. कुणीतरी पटकन फोन करुन ऍम्बूलन्स बोलावली.


अंजली बेडवर पडलेली होती. तिच्या जवळ डॉक्टर उभे होते आणि तिचा बीपी चेक करीत होते. इन्स्पेक्टर, भाटीयाजी, शरवरी आणि अजून एकदोनजन तिच्या आजुबाजुला अस्वस्थतेने उभे होते.

'' डॉक्टर कशी आहे तब्येत?'' शरवरीने विचारले.

'' यांच्यावर मोठा अनपेक्षीत मानसिक आघात झालेला दिसतो आहे की जो त्या पेलू शकल्या नाहीत... अश्या वेळेस थोडा वेळ, थोडा अवधी जावू देणं फार महत्वाचं असतं... सध्या ह्यांना मी झोपेचं इन्जेक्शन दिलं आहे... तोपर्यंत तुम्ही लोक बाहेर बसा... पण यांना शुद्ध आल्याबरोबर यांच्याजवळ कुणीतरी असणं आवश्यक आहे... यांच्या जवळचं कोण आहे?'' डॉक्टरांनी विचारले.

'' मी'' शरवरी म्हणाले.

'' तुम्ही कोण त्यांच्या... बहिण?''

'' नाही मी त्यांची मैत्रीण'' शरवरी म्हणाली.

'' दुसरं कुणी नाही का ... आई वडील?''

शरवरीने इकडे तिकडे पाहालं तेव्हा इन्स्पेक्टर म्हणाले, '' डॉक्टर त्यांच्या जवळच्या नात्यातलं असं कुणीच नाही आहे''

'' बरं ठिक आहे ... असं करा तुम्ही यांच्याजवळच थांबा '' डॉक्टर शरवरीला म्हणाले.

तसंही शरवरीचं तिथून हलण्यास मन तयार नव्हतं. बाकीचे सर्व लोक खोलीतून बाहेर पडले आणि शरवरी तिथेच तिच्या उशाशी बसून राहाली. कितीही नाही म्हटलं तरी शरवरीला आपल्या मैत्रीणीबद्दल आपुलकी वाटत होती. ती जरी तिची बॉस असली तरी तिने कधी तिला बॉससारखी वागणूक दिली नव्हती. आणि खरं म्हणजे अंजलीने तिला एक मैत्रिण म्हणूनच तो तिच्या पीए चा जॉब जॉइन करायला सांगितला होता. शरवरी तिच्या उशाशी बसून तिची शुध्दीवर येण्याची वाट पाहू लागली.


अंजलीला इंजक्शन देवून जवळपास दोन-तिन तास होवून गेले होते. तिच्या रुमच्या बाहेर अजूनही इन्स्पेक्टर, भाटीयाजी आणि इतर बरेच लोक तिची शुध्दीवर येण्याची वाट पाहू लागले होते. शुद्धीवर आल्यावर तिची मानसिक परीस्थिती कशी राहाते यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून होत्या. खरं म्हणजे तिला आई वडिल असं जवळचं कुणीच नसल्यामुळे तिने विवेकवर आपला जीव पुर्णपणे झोकून दिला होता. आणि तोच या जगातून नाहीसा व्हावा हा तिच्यासाठी खुप मोठा आघात होता. तेवढ्यात एक नर्स लगबगीने बाहेर आली.

'' इन्स्पेक्टर त्यांना शुद्ध आली आहे'' नर्स म्हणाली आणि पुन्हा आत नाहीशी झाली.

सगळे लोक लगबगीने आत गेले.

आत अंजली शरवरीच्या खांद्यावर डोकं ठेवून हमसून हमसून रडत होती. आणि शरवरी तिच्या पाठीवर थोपटून आणि तिच्या डोक्यावर हात फिरवून तिला शक्य होईल तेवढा धीर देत होती. आधी तिला ती वाईट बातमी कळाल्यानंतर तिच्या भावना व्यक्त करण्यास वाव मिळाला नव्हता. ती आपल्या भावनांना व्यक्त करण्याच्या आधीच बेशुद्ध पडली होती. खोलीतलं ते हृदयविदारक दृष्य पाहून इन्स्पेक्टर तिला धीर देण्यासाठी पुढे सरसावू लागले तेव्हा बाजुला उभ्या असलेल्या डॉक्टरांनी त्यांना हातानेच थांबण्याचा इशारा केला. डॉक्टरांचही बरोबर होतं. तिच्या सर्व भावना बाहेर येणं फार आवश्यक होतं. सगळेजण, त्यांना जरी वाईट वाटत होतं तरी शांततेने ते दृष्य पाहत होते.

तेवढ्यात रुमच्या बऱ्याच दूरुन, बाहेरुन, कदाचित दवाखान्याच्या मुख्य दरवाजातून आवाज आला, '' अंजली...''


क्रमश:...   


Read भारतीय कृषि अनुसंधान परिषद | भारतीय...